महाराष्ट्र प्रांतीय सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज, संगमनेर.
  महाराष्ट्र प्रांतीय सभा
 • अखिल भारतीय अधिवेशन शताब्दी महोत्सव १९१६ - २०१६
  रविवार दिनांक २५ / १२ / २०१६

  वेळ - सकाळी - ९ वाजता स्थळ - महेश भवन, बडनेरा रोड, अमरावती.

  अधिक माहिती...
 • वधु - वर पालक परिचय मेळावा (पदवीधर - अ-पदवीधर )
  दि. २८ व २९ जानेवारी २०१७

  स्थळ : चव्हाण मोटर्स, अक्कलकोट रोड, सोलापुर. - 9823080850

  अधिक माहिती...

सुस्वागतम्

महाराष्ट्र प्रांतीय सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज, संगमनेर समाजाच्या mahaprantikssksamaj.com या संकेतस्थळावर आपले मनःपूर्वक स्वागत आहे. येथे महाराष्ट्र समाजातील संशोधन, मंदिरे, कार्यालये, समाज वृत्तांत, उपक्रम इ. माहिती मिळण्याचे mahaprantikssksamaj.com हे संकेतस्थळ आहे. भेट दिल्याबद्दल धन्यवाद...!

आपल्या अखिल भारतीय सो. स. क्षत्रिय समाजाचे हुबळीत १९७६ मध्ये सुप्रसिद्ध ८ वे ऐतिहासिक अधिवेशन झाले. त्यात नवीन घटना तयार करण्यात आली. तिच्यात आपल्या संघटनेची ध्येये आणि उद्दिष्टे जाहीर करण्यात आलीत. त्या सर्वांनी अंमलबजावणी करायची असेल तर आधी संपूर्ण समाजाला सुसंघटीत करणे अगत्याचे आहे. आपला सारा समाज फक्त कोणत्याही एकाच राज्यात एकवटलेला नाही. विशिष्ट ऐतिहासिक परिस्थितीमुळे तो उपलब्ध माहितीप्रमाणे देशाच्या मुख्यतः सात राज्यात पसरलेला आहे. त्याची अधिकतर संख्या कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात असून बाकीच्या मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान व तामिळनाडू या राज्यात केवळ काही हजाराच्या संख्येने लोक आहेत. वेगळ्या भाषा, एकमेकापासून अलगता, शेकडो वर्षांपासून परस्पर-संबंधाचा पूर्ण अभाव इ. कारणांनी त्यांच्यात एक-दुस्याविषयी अनोळखीची भावना आहे. एकंदरीने अशा प्रतिकूल परिस्थितीत त्या सर्वांना सामाजिक उन्नतीसाठी एकाच मध्यवर्ती संघटनेत संघटीत करण्याची फार आवश्यकता आहे. हे कार्य कठीण असल्याने घिसाडघाईने होण्याजोगे नाही. ते क्रमवारच व्हायला पाहिजे. सर्वप्रथम या बांधवांना आपल्याला स्थानिक ग्रामसभांत संघटीत केले पाहिजे. नंतर त्या सर्व ग्रामसभा व त्यांच्याकडून होणारी सर्वप्रकारची कार्ये यांच्यात परस्पर संबंध व सामंजस्य स्थापित करून त्यांच्या मार्गदर्शनासाठी प्रांतीय समितीची आवश्यता आहे. आपले लोक राहतात, त्या सर्व प्रांतात या पध्दतीने निर्माण होणाऱ्या प्रांतीय समित्या मग केंद्र-समितीशी संबंध होतील व तिच्या मार्गदर्शनाखाली कामे करायला लागतील.

अधिक माहिती